कोगनोळी वासीयाकडुन तात्कालीन उपनिरीक्षक बी एस तळवार यांचा सन्मान…

कोगनोळी – राहुल मेस्त्री

निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बी एस तळवार यांची पोलीस निरीक्षक पदी बढती मिळल्याबदल अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छेचा वर्षाव केला आहे. दि.2 रोजी पोलीस निरिक्षक बी एस तळवार यांचा कोगनोळी ता.निपाणी येथील ग्रा पं.सदस्य सुनील माने,ग्रा.पं.सदस्य सुजित माने,सामाजिक कार्यकर्ते कुमार व्हटकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

दहा वर्षांपूर्वी कर्नाटक पोलीस दलात रुजू झालेले पोलीस निरीक्षक तळवार हे गेल्या दोन वर्षांपासून उपनिरीक्षक पदावर सेवा बजावत असताना निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कर्नाटक महाराष्ट्र आंतरराज्य कोगनोळी सिमा तपासणी नाक्यावर कोरोणाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कर्नाटकात कोरोणा संसर्ग रोखण्यासाठी महत्त्वाची भुमिका पार पाडली आहे.

त्याचबरोबर निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गावातील कायदा सुव्यवस्था आणि अनेक गुन्हयांचा तपास यशस्वीपणे पार पाडला आहे..या केलेल्या सन्मानाबदल बी एस तळवार यांनी क्रुतज्ञता व्यक्त केली.स्वागत व प्रास्ताविक तौसिफ मुल्ला यांनी केले. याप्रसंगी निलेश मगदूम, अमर माने, रोहित माने, मारुती लोखडे, विठ्ठल माने, सौरभ कगुडे, साबीर शेंडूरे, राहुल माने, सोन्या नावळे, जावेद नाईकवाडे, प्रदीप माने, ऋषिकेश माने, नितीन माने, प्रणय माने यांच्यासह अनेकजन उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here