शिक्षक दिनानिमित्त तेल्हारा तालुक्यातील शिक्षकांचा सन्मान, जागर फाउंडेशन चा उपक्रम…

दानापूर – गोपाल विरघट

महामारीच्या काळात शाळा बंद असल्या तरी तेल्हारा तालुक्यातील शिक्षण सुरू ठेवणाऱ्या शिक्षकांचा जागर फाउंडेशन च्या वतीने सन्मानपत्र,भेटवस्तू ,शैक्षणिक पुस्तक देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक वासुदेव देऊळकर गुरुजी तसेच प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती तेल्हारा शिक्षण विस्तार अधिकारी गोपाल भुजबले, शिक्षक संघ तालुका अध्यक्ष मनोहर शेळके व शिक्षक पतसंस्था संचालक विशाल घोगले, शिक्षक नेते देवमन रौंदळे,प्रमोद वडदकार, शीलाताई भोपळे,जागर फाउंडेशन चे संयोजक तुलसीदास खिरोडकार उपस्थीत होते.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून कोविड १९ महामारीच्या काळात ऑनलाइन व ऑफलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले अशा शिक्षकांचा गौरव कार्यक्रमात करण्यात आला. याप्रसंगी सहदेव चिकटे,ओमप्रकाश रा. उगले,विनोद बोचे, अविनाश देशमुख,श्याम पाठक, सलमान खान,

राजेश चित्ते,प्रफुल चिमणकर,प्रवीण चिंचोळकर, प्रशांत खुमकर,ओमप्रकाश पु. उगले,सौ. सुरेखा भुजबले,देवकाबाई कळसकार, जयश्री कुशलपांडे,हेमलता चव्हाण ,प्रमिला राऊत,शुभदा वानखडे,सीमा उगले,सारिका देशमुख,सीमा हिरोळे,दिपाली वानखडे,माया काळबांडे यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

कोविड काळातील राबविलेल्या अध्यापन प्रयोग बाबत सन्मान पात्र शिक्षकांनी आपले मनोगत कार्यक्रमप्रसंगी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश तिडके यांनी केले.प्रास्ताविक जागर चे गोपाल मोहे तर आभार दीपक पोके यांनी मानले. कोविड चे नियम पालन करुन कार्यक्रम यशस्वीतेसाठी निखिल गीर्हे ,शैलेंद्र भोपळे ,विजय इंगळे,राहूल भामोद्रे यांनी पुढाकार घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here