सेवानिवृत्त माजी सैनिक तुकाराम भगत यांचा प्रामाणिकपणा…

मुर्तिजापूर- दर्यापूर रोडवरील नालंदा नगर चे रहिवासी व माजी सैनिक आदरणीय तुकाराम भगत यांनी दि.२८ जानेवारी २०२२ ला मुर्तिजापूर पोस्ट ऑफिस कार्यालयातून आपली आर.डी.विड्राॅल केली.एकुण पाच लाख आठ हजार एवढी रक्कम देय्य असतांना त्यांना मात्र संबंधित कर्मचा-याकडून अनावधानाने पाच लाख अठ्ठावन्न हजार एवढी रक्कम देण्यात आली.

तुकाराम भगत यांनी सदर रकमेची पडताळणी केल्यावर त्यांच्या ही बाब लगेच लक्षात आली.त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता ही रक्कम संबधित कर्मचा-यांना परत केली.विशेष म्हणजे या रकमेसाठी संबंधित कर्मचारी त्यांना आठ दिवसापासून पोस्ट ऑफिसमध्ये चकरा मारायला लावत होते.

परंतू तरीही त्यांनी मनात कुठलाही आकस न ठेवता सदरहू कर्मचा-यांचे नुकसान टाळले. फसवाफसवीच्या अनेक बातम्या नित्य कानावर पडत असतांनाच्या या काळातही प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे उदाहरण तुकाराम भगत यांनी सर्वांसमोर ठेवले.त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here