मा.मुख्यमंञी महोदय शाळा सुरु करण्याचा अट्टाहास कशासाठी…भुषण भिरड

आज संपुर्ण देशात महाराष्ट्र राज्य कोरोना प्रादुर्भावामध्ये अग्रस्थानी आहे कोरोना रुग्णांनी ५०,००० आकडा गाठला आहे त्यात राज्यात मुंबई,ठाणे,पुणे,नाशिक,औरंगाबाद,नागपुर,अकोला,यवतमाळ अशा शहरांमध्ये कोरोनाचा मोठ्याप्रमाणा वर प्रसार झाला असुन इत्तर जिल्ह्यामध्ये देखिल कोरोनाचे रुग्ण वाढतानां दिसत आहे अशातच…


महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंञी वर्षा गायकवाड यांनी १५ जुन २०२० पासुन शाळा उघडण्या संदर्भात संकेत दिले आहेत परंतु ज्या बाबी निदर्शनास येत आहेत त्यानुसार जेष्ठ नागरिक व लहान मुलांमध्ये कोरोना चा प्रादुर्भाव वेगाने होताना दिसतोय त्यातच शाळा उघड्याच्या म्हटलं इयत्ता पहीली ते दहावी तील विद्यार्थी समजुदार नसतात त्यात शाळा सुरु झाल्यास शाळाची सक्ति नाहीतर दंड वसुली आणि पाल्यांचे शैक्षणिक नुकसान या विषयी विचार केला असता

नाईलाजास्तव पालकांना आपल्या पाल्यानां शाळेत पाठवावे लागेल त्यात सामाजिक अंतर ठेवणे,मास्कचा वापर करणे,हात धुन्याकरीता सॅनिटायझर चा वापर करणे अशा अनेक नियमाचे कळेकोट पालन होणार नाही त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे अशातच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अकोला जिल्हाध्यक्ष भुषण भिरड यांनी थेट राज्याच्या मुख्यमंञ्यानां ई-मेल व्दारे निवेदन सादर केले आहे

Also Read: जिल्हाधिकारी कार्यालयात सोशल डिस्टंसिंगचा अनोखा उपक्रम…व्हीडीओ कॉलद्वारे नागरिकांचा प्रशासनाशी संवाद


ज्यात त्यांनी १५ जुन २०२० ला कुठल्याही परिस्थितीमध्ये शाळा सुरु करु नये त्याच बरोबर किमान जुलै २०२० पर्यंन्त शाळा बंद ठेवाव्या अशी विनंती केली आहे

पालकांना नम्र आवहान करण्यात येते की,आपल्या पाल्यांच्या आरोग्या करीता कृपया आपण “No Sefty_No School” हे अभियान सोशल मीडीया वर चालवावं हि विनंती…
भुषण भिरड,जिल्हाध्यक्ष,मनविसे,अकोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here