‘महाव्हाईस् न्यूज’च्या वर्धापन दिन सोहळ्याला मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभणार…

न्यूज डेस्क :- येत्या ३० जून २०२१ रोजी ‘महाव्हाईस् न्यूज’ हे चौथ्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे. हा वर्धापन दिन सोहळा अतिशय उत्साहात साजरा साजरा होणार असून या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ‘महाव्हाईस् न्यूज’ च्या राज्याचे मुख्य कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

तेव्हा वर्धापन दिन सोहळ्याचे दीप प्रज्वलन आणि मुख्य कार्यालयाचे उद्घाटन हे राज्याचे मा.मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा.श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार आहे. या सोहळ्याला राज्यातील राजकीय पक्षांचे प्रमुख मान्यवर,प्रतिष्ठित उद्योजक,विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहे.

‘महाव्हाईस् न्यूज’चे मुख्य संपादक श्री गजानन गवई,संचालक श्री चंद्रकांत इंगळे,सिईओ श्री.श्रीकांत गोटे,मराठवाडा व विदर्भाचे इनपुट हेड श्री मनोहर निकम यांनी मा.श्री.देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून ३० जून २०२१ रोजी होणाऱ्या वर्धापन दिन सोहळा व मुख्य कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे रीतसर निमंत्रण दिले असता श्री फडणवीस यांनी ते स्वीकारून कार्यक्रमाला येण्याचे निश्चित केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here