मनसर येथे महाआवास अभियानातंर्गत गृहप्रवेश…

रामटेक – राजु कापसे

ग्राम पंचायत मनसर, पंचायत समिती रामटेक व जिल्हा परिषद नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक १३ जून २०२१ ला ग्राम पंचायत मनसर वार्ड क्रमांक ४ येथील रमाई आवास योजनेचे लाभार्थी श्री रमेश वामनराव रंगारी यांनी महाआवास अभियानाच्या मुदतीत घरकुलाचे बांधकाम पूर्ण केल्यामुळे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून रीतसर व विधिवत पूजन करून सदर अभिनव कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

सदर कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून सरपंच सौ योगेश्वरी हेमराज चोखांद्रे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य सतीश डोंगरे व ग्राम पंचायत सदस्य गण उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाप्रसंगी लाभार्थी श्री रमेश रंगारी यांनी घराची उत्कृष्ठ सजावट केलेली होती, त्यामुळे उपस्थितांकडून त्यांचा सपत्नीक पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व गृहप्रवेश केल्याबद्दल शुभेच्छा देण्यात आल्यात.

त्याप्रसंगी पंचायत समिती रामटेक चे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक श्री सागर वानखेडे,ग्रामीण गृहनिर्माण अभियंता शुभम खडसे, मयूर कोल्हे माजी ग्राम पंचायत सदस्य प्रा.हेमराज चोखांंद्रे,दिनेश पंधराम,ग्राम पंचायत सदस्य राजेंद्र रामटेके, नंदकिशोर चंदनखेडे,ग्राम पंचायत सदस्या संगीता पंधराम, सीमा गजबेस व लता उईके ,रोजगार सेवक विनय मेश्राम,ग्राम पंचायत कर्मचारी व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here