महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने एटापल्लीत अन्यायकारक शासननिर्णयाची होळी…

गडचिरोली – मिलींद खोंड

महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत एटापल्ली जिल्हा गडचिरोली येथील राजीव गांधी हायस्कूल च्या प्रांगणात दिनांक १६ सप्टेंबर २०२० रोजी जाहीर केलेल्या शासन कृती समिती स्थापनेच्या शासन निर्णयाची होळी तसेच दिनांक १६ सप्टेंबर २०२० रोजी माध्यमिक शाळा माधील इयत्ता पाचवीचा वर्ग प्राथमिक शाळेस जोडावा असा काढण्यात आलेला शासन निर्णय ताबडतोब रद्द करावा. व त्रृटी समिती रद्द करून शासनाने

१)अनुदानासाठी घोषीत विनाअनुदानित शाळांना तसेच २० टक्के अनुदान घेणाऱ्या शाळांना प्रचलित नियमाप्रमाणे अनुदान त्वरित द्यावे.

२) तसेच ज्या शाळा अद्याप अनुदानासाठी घोषित करण्यात आलेल्या नाहीत त्यांना अनुदानासह घोषित करावे.

३) तसेच या शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अनुदानित शाळांप्रमाणे सेवा संरक्षण मिळावे. यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रभर या दोन शासन निर्णयांची होळी करण्यात येत आहे.

त्यानुसार आज राजीव गांधी हायस्कूल, एटापल्ली जिल्हा याठिकाणी या दोन्ही शासन निर्णयांची होळी करण्यात आली.यावेळी श्री.श्रीकांत कोकुलवार जिल्हा अध्यक्ष म.रा.कायम विनाअनुदानित शाळा कृती समिती, प्रतिक मुधोळकर एटापल्ली तालुका सचिव, फहीम शेख तालुका अध्यक्ष, वासुदेव चनाकपुरे तालुका कार्यवाह, सुलतान पठाण तालुका उपाध्यक्ष, आय.के.शेख ता. संघटक, सुरेश तलांडे, अशोक गोरे आदी विनाअनुदानित शिक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here