आईला मारहाण केल्याचा राग मनात घेऊन लहान भावाने केली मोठ्या भावाची धारदार शस्त्राने हत्या…

मौदी येथील हत्या प्रकरणातील दोन आरोपींना अटक

देवलापार – पुरुषोत्तम डडमल

आईला मारहाण केल्याचा राग मनात घेऊन लहान भावाने मोठ्या भावाचा धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना पवनी जवळील मौदी गावात आज सकाळी उघडकीस आली.मृतकाचे नाव क्रिष्णा बाबूलाल मसराम(३६)राहणार चारगाव असे आहे.घटनेतील दोन आरोपींना पोलिसांनी नागपूर येथून अटक केले.

सविस्तर वृत्त असे की,चारगाव येथील रहिवासी क्रिष्णा मसराम याने काही कारणावरून आई दसवंती हिला मारहाण केली होती.तीला उपचाराकरिता देवलापार ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी प्रथोमपचार करून पुढील उपचारासाठी नागपूरला हलविले.याच दरम्यान प्रमोद मसराम व अन्य दोघे जण त्याच्या आईला भेटण्यासाठी देवलापार ग्रामीण रुग्णालयात गेले.

तेव्हा प्रमोद मसराम यास त्याच्या आईला क्रिष्णा मसरामने मारल्याचा राग मनात घेवुन त्याने क्रिष्णा मसराम याचे घरी जावून धारदार हत्याराने त्याची हत्या करुन पसार झाल्याचे पोलिसांना कळताच ठाणेदार प्रविण बोरकुटे यांनी तपास चक्र गतीमान करुन आरोपी शोधार्थ पो.उप.नि पुंजरवाड़ व स्टाफ यांचे सह एक पथक नागपुर येथे रवाना केले.

सदर घटनेची माहीती पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण व मा.अप्पर पोलीस अधिक्षक,उपविभागीय पोलीस अधिकारी कन्हान यांना दिली.घटनरचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस अधिक्षक राहुल माखनीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कन्हान व फोरेन्सीक सायन्स पथक यांनी घटनास्थळी भेट देवुन तपासा करीता मार्गदर्शन केले व सदर मृतकचा घटनास्थळ पंचनामा व इन्व्वस्ट पंचनामा कार्यवाही मोक्यावर करून सदरचे मृतदेह शवविच्छेदना करीता देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.
नंदकिशोर हिरालाल धुर्वे(३०)राहणार चारगाव यांचे तोंडी रिपोर्ट वरून आरोपी विरूध्द पो.स्टे . देवलापार अपराध क्र.१२०/२१ कलम ३०२ भा.द.वी.चा गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे.

सदर आरोपीचा शोध पोलीस अधिक्षक ,अप्पर पोलीस अधिक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कन्हान यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार प्रविण बोरकुटे, पो.उप.नि केशव पुंजरवाड, संदीप नागोसे, सतिश नागपुरे ,राहुल कॉन्केटवार, शिवचरण नागपुरे व स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांनी घेतला असता यातील आरोपी नामे १) प्रमोद बाबुलाल मसराम(३४)राहणार चारगाव ( मौदी ) ह.मु.खसाळा नाका नं .०२ तालुका कामठी ,नागपुर २ )अतुल क्रिष्णाजी पुराम(२७) राहणार न्यु खसाळा नाका नं.०२ कामठी नागपुर या दोघांना मेडीकल हॉस्पीटल,नागपूर येथुन पोलिसांनी ताब्यात घेवून सदर गुन्हयात अटक केली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास देवलापारचे ठाणेदार प्रविण बोरकुटे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here