हिंगणी बु. येथे सिलेंडरच्या भडक्यात घर जळून खाक…

लाखोंचे आर्थिक नुकसान
जीवितहानी टळली

तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येत असलेल्या हिंगणी येथे सिलेंडरचा भडका होऊन जवळपास सात ते आठ घरांना आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे.

हिंगणी बु. येथील रहिवाशी मंगलाबाई शेषराव कोरडे यांच्या राहत्या घरी सिलेंडरचा स्फोट झाला त्यामुळे सर्व जीवनावश्यक वस्तूसह ५० हजार रोख रक्कम जळून खाक झाल्या आहेत हिवरखेड पोलीस व तेल्हारा अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here