मुंबईत अभिनेत्रीसह मॉडेलचा समावेश असलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड…

न्यूज डेस्क – मुंबईतील गोरेगावमधील 5 स्टार हॉटेल मध्ये सुरु असलेल्या देह व्यापारावर पोलिसांनी धाड टाकली आहे. यामध्ये पोलिसांनी बॉलिवूडमधील आंतरराष्ट्रीय बेली डान्सरसह दोन टीव्ही मालिकेतील अभिनेत्रींना ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका 5 स्टार हॉटेलमध्ये दोन मालिकांमधील अभिनेत्रींचा 10 लाखांसाठी सौदा केला जात असताना पोलिसांनी छापा टाकून त्यांना पकडलं आहे.

मुंबईतील गोरेगावच्या 5 स्टार हॉटेलमध्ये पोलिसांनी वेशांतर करून ग्राहक म्हणून गेले होते त्याप्रमाणे या ठिकाणी सापळा रचला आणि इथे चालू असणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या हॉटेलमध्ये देहव्यापार आणि सेक्स रॅकेट चालवलं जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या प्रकरणी पोलिसांनी राखी सावंतची मैत्रिण आणि बॉलिवूडची अभिनेत्री हिच्यासह तीन तरुणींना ताब्यात घेतलं आहे. आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हे शाखेच्या पथकाने हॉटेलवर छापा टाकला.

पोलिसांच्या एका टीमला हॉटेलमध्ये ग्राहक म्हणून पाठवण्यात आलं होतं. ही टीम मुलींचा वेश्या व्यवसाय करणाऱ्यांना भेटणार होती. सगळं ठरल्याप्रमाणे सुरू होतं. 10 लाखांचा सौदाही पक्का झाला आणि त्याचवेळी पोलिसांनी छापा टाकून तीन मुलींची सुटका केली आहे.

पोलिसांनी आरोपींविरोधात देहव्यापर करणाऱ्या टोळीविरोधात गुन्हा दाखल केला असून ताब्यात घेतलं आहे. यामध्ये राखी सावंतची मैत्रिण सापडल्यानं मोठी खळबळ उडाल्याची माहिती मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here