चित्रपटसृष्टीतील कामगार वर्गाला हवाय एक हात मदतीचा..!

गणेश तळेकर

ही आहे मराठी – हिंदी चित्रपटनगरी , श्री दादासाहेब फाळके चित्रनगरी. गोरेगाव , मुंबई.

अनेक सिनेमे , मालिका रोज इथे बनतात , पण जो कलाकार – टेक्निशियन आज या कोरोना काळात उपाशी आहे, मनोरंजन करणारा हा कामगार वर्ग आज उपेक्षित आहे त्याकडे कोणती युनियन कोणता नेता त्याच्यामागे थांब पणे उभे राहायला तयार नाही आहे, त्यासाठी बोलायला तय्यार नाही असे का ?

त्याच्या मुलांच्या शाळेच्या फीचे पैसे कसे भरायचे , घर कसे चालवायचे हा यक्ष प्रश्न त्याच्या पुढे उभा आहे.पण ते हतबल आहेत काहीच करू शकत नाही. तो वाट पाहत आहे आपल्या माणसाच्या मददतीची…!

आज आपण मोबाईल वर अनेक सिनेमे मालिका पाहतो पण त्या मागे या कलाकार – टेक्निशियन याची खूप मेहनत असते .बघा आपण रसिक प्रेक्षकांनी आता त्यांना साथ द्यायची वेळ आली आहे .एक हात मददतीचा द्यावा ही विनंती…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here