सोयाबीन पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करा – माजी मंत्री रमेशचंद्र बंग…

राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे कृषिमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन.

नागपूर – शरद नागदेवे

हिंगणा – नागपूर जिल्हातील सोयाबीन पिकावर अतिशय दुर्धर प्रकारचा रोग आला असून त्यामुळे शेतकरी वर्गावर मोठे संकट ओढवले आहे. प्रशासनाने सोयाबीन पिकाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी असे निवेदन माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने राज्याचे कृषिमंत्री मा. ना. दादारावजी भुसे साहेब,मा. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व जिल्हाकृषी अधिक्षक यांना दिले.

जिल्हात सोयाबीन चे पीक मोठया प्रमाणात घेतले जाते त्या पिकावर अचानक पणे गंभीर रोगाची लागण झाली त्यामुळे सोयाबीन पीक शंभर टक्के नाहीसे झाले. आधीच कोविड मुळे आणि जनावरांवर आलेल्या लंम्पि रोगामुळे शेतकरी वर्ग मोडकळीस आला त्यात तोंडावर आलेल्या सोयाबीन पिकाचे पूर्णपणे नुकसान झाले त्यामुळे बियाणे, खत, औषधी आदी वर कर्ज काढून शेतकऱ्यांनी खर्च केला.

आता हातचे पीक जाणार या विचाराने शेतकरी हवालदिल झाला आहे. अश्या शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सोयाबीन पिकाचे पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी असे निवेदनात म्हटले आहे.निवेदनाची दखल घेत कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी त्वरित शेतावर जाऊन सोयाबीन पिकाची पाहणी करण्याचा निर्णय घेतला. व हिंगणा विधानसभा क्षेत्रातील मोहगाव येथील सोयाबीन उत्पादक शेतकरी श्री जयस्वाल यांच्या शेतावर जाऊन पाहणी केली.

विशेष म्हणजे कालच रमेशचंद्र बंग यांनी सोनेगाव बोरी येथे शेतकऱ्यांशी चर्चे दरम्यान सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या शासन दरबारी मांडून शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार असे सांगितले होते.

यावेळी माजी आमदार विजयबाबू घोडमारे, हिंगणा पंचायत समितीचे सभापती बबनराव अव्हाळे, नागपूर पंचायत समितीचे उपसभापती संजय चिकटे, जिनींग प्रेसिंगचे अध्यक्ष प्रकाश नागपुरे, जिल्हा परिषद सदस्य सुचिता ठाकरे, पंचायत समिती सदस्य पौर्णिमा दीक्षित, विनोद ठाकरे, बाबुभाई पठाण, सुशील दीक्षित,आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here