शेती व घरांचे तात्काळ पंचनामे करून मदत द्या – आमदार बाळाभाऊ काशिवार यांची मागणी…

लाखांदुर – नास्तिक लांडगे

सलग तिन दिवस पुर स्थिती कायम राहिल्यामुळे लाखांदुर तालुक्यातील वैनगंगा नदीकाठावरील गावांना पुराचा फटका बसला आहे. यात सोनी, आवळी, चप्राड, खैरी/पट, विहीरगाव, टेंभरी, डांभेविरली, गवराळा, मोहरणा, खैरणा, नांदेड, दोनाड, ईटान, विरली/खुर्द या गावांचा समावेश आहे. तर वैनगंगा नदीच्या बँक वाटरचा विसर्ग चुलबंद नदी व नाल्यांना झाल्यामुळे सावरगाव, मेंढा, लाखांदुर, किन्हाळा, आसोला या गावांना देखील पुरस्थिती उद्धभवली होती.

दरम्यात यात मोठ्या प्रमाणात शेतीचे व घरांची पडझड झाली आहे. सर्वाधिक नुकसान खैरी/पट व ईटान गावात झाले असून, येथील शेती पुर्णतः पाण्याखाली आली आहे तसेच घरे देखील पडले आहेत. डांभेविरली येथील कित्येक लोकांची जनावरे वाहून गेली आहेत.

तर अन्य गावांमध्ये देखील अशाच पद्धतीचे नुकसान झाले असल्यामुळे प्रशासनाने तात्काळ सर्वे करून १००% नुकसान दाखवावी. तर शासनाने शेतीला हेक्टरी ५० हजार रुपये मदत जाहीर करून घरांच्या झालेल्या पडझडी करीता देखील मदत द्यावी. अन्यथा तिव्र आंदोलन उभारू असा इशारा साकोली विधानसभा क्षेञाचे लोकप्रिय माजी आमदार बाळाभाऊ काशिवार यांनी दिला आहे.

मा.आ.काशिवार हे दोन दिवसापासुन लाखांदुर तालुक्यातील पुरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यांवर असून, दि.३१ आँगस्ट रोजी त्यांनी नावेतून ईटान, विरली/खुर्द भागातील नुकसानीची पाहणी केली आहे. तर दि.१ सप्टेंबर रोजी देखील आवळी, सोनी, चप्राड, मेंढा, खैरी/पट, विहीरगाव, टेंभरी, डांभेविरली, सावरगाव गावांची पाहणी केली.

आवळी येथील संपूर्ण घरे पाण्याखाली आल्याने त्यांना इंदोरा येथील जिल्हा परिषद शाळेत वास्तव्याला ठेवले आहे. मा.आ.काशिवार यांनी सदर शाळेला भेट देऊन आवळी वासीयांच्या व्यथा जाणून घेत संबंधीत प्रशासनाशी संपर्क साधून सर्वतोपर मदत मिळवून देण्यास आपण कटीबद्ध असल्याचे सांगितले. व वेळेवर जेवन देण्यास देखील सांगीतले आहे.

तसेच ज्या गावांमध्ये पुराचे पाणी आले होते अशा सर्व गावांमध्ये फवारणी करून जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सुचना तालुका आरोग्य अधिकारी व खंडविकास अधिकारी यांना दिल्या आहेत. दौऱ्या दरम्यान कित्येक शेतकऱ्यांनी धानाचे पैसे मिळाले नसल्याचे सांगितले असता, संबंधितांशी बोलून एक आठवडय़ात थकीत असलेले धानाचे चुकारे देण्याच्या सुचना दिल्या आहेत.

पुरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतर पोट तिडकीने आपल्या मदतीला धावून आल्याबद्धल पुरग्रस्त भागातील जनतेनी मा.आ.काशिवार यांचे आभार मानत. साहेब आपणच आम्हचे कैवारी आहात. देवासारखे धावून आलात असे म्हणत आपल्या व्यथा कथन केल्या आहेत.

यावेळी दौऱ्यात भाजपा जिल्हा महामंत्री नरेश खरकाटे, तालुका अध्यक्ष विनोदजी ठाकरे, माजी अध्यक्ष नुतनजी कांबळे, भाजयुमो तालुका अध्यक्ष योंगेंद्र ब्राम्हणकर, नगरसेवक हरीष बगमारे, नगरसेवक रमेश मेहेंदळे, रिजवान पठान, जितेंद्र ढोरे,

भुषण चिञीव, रवीभाऊ गेडाम, रजत गौरकर, हेमंत मेश्राम, राहूल येवले, मदन एंचीलवार, योंगेश एंचीलवार, सरपंचा सौ.कल्पना खंडाते सोनी, सरपंचा सौ.कुसुम दिघोरे, वामन नखाते, मनोहर ढोरे, दिपक बुराडे, भाऊराव ठाकरे यांच्यासह आदी उपस्थित होते.

खैरी/पट येथील मृतकाच्या कुटूंबियांची सांत्वन भेट
पुर परिस्थितीमुळे विहीरीतील मोटारपंप बाहेर काढण्यासाठी विहीरीत उतरलेल्या खैरी/पट येथील राजकुमार सोमाजी वाघधरे नामक व्यक्तीची विहीरीतील गँसने गुदमरून मृत्यु रविवारला (ता.३०) झाला आहे. दरम्यान आज मंगळवारला (ता.१) मा.आ.बाळाभाऊ काशिवार यांनी मृतक राजकुमारच्या कुटूंबियांना सांत्वन भेट दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here