तेल्हारा तालुक्यात विजेच्या गडगडाट सह मुसळधार पाऊस! सोयाबीन पिकाचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान..!

तेल्हारा – गोकुळ हिंगणकर सह चेतन दही

तेल्हारा तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन सोंगणी व कापूस वेचणीला सुरुवात केली होती.दरम्यान , शनिवारी पुन्हा तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली.

अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांसह सामान्य व्यावसायिकांना एकच धावपळ करावी लागली.तालुक्यात शनिवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते.रात्रीच्या सुमारास पावसाने तडाखा दिल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धुव्वाधार पाऊस व विजांमुळे नागरिकांमध्ये भीतीचेवातावरण निर्माण झाले होते.

तालुक्यात सुमारे ३० ते ४५ मिनिटे झालेल्या पावसामुळे रस्त्यावरून पाणी वाहून गेले होते.अजूनही अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन सोंगणी अद्याप राहिलेली असल्याने धास्तावला आहे.तसेच तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची सोंगणी करून शेतात गंजी मारली कापूस वेचणीला आला असून, ज्वारी तयार करण्यासाठी सौगुण शेतात पडली आहे.

हवेचा वेग जास्त असल्याने शेतात उभी असलेली पिकएजमीनदोस्त झाली आहेत. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांवर दरवर्षीप्रमाणे अस्मानी संकट उभे राहिले आहे. अनेक शेतकऱ्यांच्याआतोंडी आलेला घास निघून गेला आहे . यादरम्यान अनेक तास शहरासह तालुक्यातील वीजपुरवठा खंडित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here