मुंबईसह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही जोरदार पावसाची शक्यता !..

न्यूज डेस्क – येत्या ३ ते ४ दिवसात कोकणसह मुंबई, ठाणे या भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले असून मध्य महाराष्ट्र व विदर्भातही जोरदार पावसाछी शक्यता असल्याचे केएस होसलीकर यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.

मुंबईत व ठाणे परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. मात्र ढगाळ वातावरण अजूनही असून हवामान विभागानं येत्या तीन ते चार दिवसांमध्ये जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. याबाबत ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी ट्विट करून मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे.

हवामान विभागानं जाहीर केलेल्या अलर्टनुसार, मुंबईसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी उद्यापासून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं मुंबईकरांसह कोकणवासियांना पावसाचा अंदाज घेऊन कामाचे नियोजन आखावे लागणार आहे. कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे.

मुंबईसह ठाण्यातही जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here