मध्यप्रदेशात मुसळधार पावसाचा हाहाकार…३९४ हून अधिक गावांना पुराचा फटका…मदतकार्यासाठी सैन्य तैनात

न्यूज डेस्क – गेल्या दोन दिवसांपासून संततधार पावसामुळे होशंगाबादसह मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आला आहे. राज्यातील परिस्थिती एवढी बिकट बनली आहे की, पाण्याखाली गेलेल्या भागातील नागरिकांना वाचवण्यासाठी शनिवारी सैन्य आणि एनडीआरएफ प्राचारण करण्यात आले आहे.

होशंगाबादमधील सुमारे ३५०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे, तर छिंदवाड्यातील हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने पाच अडकलेल्या लोकांना बाहेर काढले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्यातील सीहोर व छिंदवाडा यासह सात जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे तलाव, नद्या व नाले धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत.

सीहोर जिल्ह्यात दोन हवाई दलाची हेलिकॉप्टर मदतकार्य करण्यासाठी येत आहेत. ७० सैनिकांसह सैन्याच्या दोन तुकड्या मदतीसाठी येत असल्याचे त्यांनी सांगितले. यातील एक सैन्य रात्री होशंगाबाद जिल्ह्यात पोहोचेल तर एक युनिट रायसेन जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जाईल.

हरदा जिल्ह्यातही अनेक ठिकाणी नर्मदा नदी धोक्याच्या पातळीवरुन वाहत असल्याची माहिती त्यांनी दिली. रस्तोगी म्हणाले की, गेल्या १२ ते १५ तासांत ९ जिल्ह्यातील ३९४ गावांमधील ६५०० हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

फोटो-tweeter

गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश राजोरा यांनी सांगितले की, पूरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी सरकारी यंत्रणा परिश्रम घेत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे की होशंगाबादमध्ये गेल्या २४ तासात शनिवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत २०८ मिमी पावसाची नोंद झाली. याच काळात होशंगाबाद जिल्ह्यातील पचमढी आणि छिंदवाडा या प्रसिद्ध हिलस्टेशन्समध्ये अनुक्रमे २२८ मिमी आणि १४२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

विशेषत: होशंगाबाद आणि सीहोर जिल्ह्यात पुरामुळे अनेक लोक वेगवेगळ्या ठिकाणी अडकले आहेत. होशंगाबादचे विभागीय आयुक्त रजनीश श्रीवास्तव यांनी दूरध्वनीवरून सांगितले की, पूर परिस्थितीला प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सैन्यदलाची मदत मागितली आहे आणि लवकरच पोहोचेल अशी अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here