मुंबईला मुसळधार पावसानं झोडपलं!…

फोटो- सौजन्य Twitter

न्यूज डेस्क – शनिवारी मध्यरात्रीपासून मुंबईत पुन्हा हजेरी लावली. मध्यरात्री १२ वाजल्यापासून पहाटे ३ ते ४ वाजेपर्यंत मुंबईच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत होता. मुंबई शहर आणि उपनगरात कोसळलेल्या तुफान पावसामुळे अनेक परिसर जलमय झाले होतो. अजूनही मुंबईच्या काही भागांमध्ये पाणी साचलेलं असून मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर पावसाचा परिणाम झाला आहे.

मुंबईच्या बोरीवली पश्चिम भागामध्ये पावसाचं पाणी साचल्यामुळे तिथे चक्क तलावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.पूर्व भागात रविवार पहाटेपासूनच जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे, परिसरात सगळीकडे पाणी साचलं आहे. रस्त्यांवर साचलेल्या या पाण्यामध्ये काही चारचाकी गाड्याही वाहून गेल्या आहेत. 

मुंबईत येणाऱ्या पुढील आठवड्यात किंवा या महिन्यातील उर्वरित दिवसांदरम्यान पावसाची स्थिती काय असेल हे अस्पष्ट असल्याचं हवामान विभागाने सांगितले. जुलैमध्ये पडणाऱ्या तीव्र पावसाच्या अनुषंगाने सध्या तरी अनुकूल स्थिती नाही. सध्याची वाऱ्यांची दिशा बघता, पूर्व आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या विरोधी वाऱ्यांमुळे मुंबईपासून पाऊस लांबच राहिल, असे अक्षय देवरस यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here