आज आणि उद्या विदर्भातील या जिल्ह्यांत कोसळणार जोरदार पाउस…

न्यूज डेस्क – गेल्या आठवड्यापासून मुंबईत पावसाची जोरदार सुरुवात झाली होती मात्र आज पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. सुरुवात झाली होती. मुंबईत अद्याप ढगाळ वातावरण असून हवामान खात्यानं पुढील 48 तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पण उद्या पासून मान्सून विदर्भात जोर धरणार आहे. अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

तर आज 13 उद्या 14 जून रोजी विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

आज नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशीम या जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर उद्या अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशीम हे जिल्हे वगळता विदर्भातील अन्य जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here