विदर्भात येत्या तीन दिवसात उष्णतेची लाट…हवामान खात्याचा इशारा

न्यूज डेस्क – होळीचा सण झाल्यानंतर काहीं दिवसाने तापामानात वाढ व्हायला सुरुवात होते, तर विदर्भात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने काही प्रमाणात अजूनही थंडावा असून मात्र काही शहरात तापमान वाढले असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. येत्या तीन दिवसात विदर्भातील तापमान ४ ते ५ डिग्री वाढणार असल्याचा हवामान खात्याने इशारा दिला आहे.

मार्च अखेरीस आणि एप्रिलच्या सुरुवातीलाच विदर्भात उष्णतेची लाट जाणवेल असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. या ठिकाणी तापमान सामान्यपेक्षा 4 ते 5 डिग्रीने वाढेल असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे विदर्भातील नागरिकांना अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. विदर्भामध्ये पुढची तीन दिवस हीट वेव राहणार असून या पार्श्वभूमीवर नागपूर वेध शाळेने येलो अलर्ट जाहीर केला आहे.

राज्यस्थान, गुजरातकडून येणारे उत्तर पश्चिमी कोरडे वारे हे महाराष्ट्रात येत असल्याने विदर्भातले तापमान वाढले आहे. सोमवारी विदर्भात सर्वाधिक तापमान ब्रह्मपुरीत 43.3 अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून बहुतांश शहराचे तापमान हे 40 अंश सेल्सिअसच्या वर होते. पुढील काळात या तापमानात आणखी वाढ होणार असल्याची माहिती नागपूर वेध शाळेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here