महामार्गावरील अपघातात आरोग्य सेविकेचा मृत्यू, दुचाकीवरून घरी परतत असताना झाला अपघात…

मनोर – मुंबई अहमदाबाद महामार्गावरील कुडे गावच्या हद्दीतील हनुमान मंदिरासमोर बुधवारी (ता.18)सायंकाळी कारला दुचाकी धडकून अपघात झाला.या अपघातात ढेकाळे आरोग्य पथकाच्या आरोग्य सेविका संगीता शांताराम बसवत (वय.45)यांचा जागीच मृत्यू झाला.त्या पालघर तालुक्यातील वांदिवली गावच्या रहिवासी होत्या.

दुर्वेस प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ढेकाळे आरोग्य पथकातील आरोग्य सेविका संगीता बसवत आपली ड्युटी संपवून सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास आपल्या सहकाऱ्याच्या मोटारसायकलवरून मनोरच्या दिशेने घरी जाण्यास निघाल्या होत्या.

महामार्गाच्या गुजरात मार्गिकेवर कुडे गावच्या हद्दीतील हनुमान मंदिरासमोर आल्यानंतर त्यांची मोटारसायकल रिव्हर्स गियरने मागे येत कारला (MH48S5958)धडकल्याने अपघात झाला.यात संगीता बसवत यांचा जागीच मृत्यू झाला.तर त्यांचा सहकारी दुचाकीस्वार चंदू लेंडे जखमी झाला आहे.

【गुजरात च्या दिशेने जात असलेल्या (MH48S5958) कारचा चालक हनुमान मंदिरासमोर याआधी झालेला अपघात पाहण्याची त्याची कार रिव्हर्स गियरने माघारी आणत होता.त्यावेळी मागून येणारी दुचाकी त्याच्या कारला मागच्या बाजूने धडकून हा अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.】

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here