राज्यात पुन्हा आरोग्य भरती होणार…आरोग्यमंत्री टोपे यांची घोषणा

फोटो- फाईल

राज्यात पुन्हा आरोग्य भरती होणार असून गट ‘क’ व गट ‘ड’च्या परीक्षा पुन्हा घेतल्या जाणार असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल याबाबत माहिती देत म्हणाले की, पेपरफुटी अनुषंगाने गैरव्यवहार चाैकशीबाबत पोलिसांचा अंतिम अहवाल प्राप्त होणे आवश्यक आहे. ‘ड’ वर्गाचा पेपर परीक्षेपूर्वीच पूर्ण व्हायरल झाल्याचे निष्पन्न झाल्याने या पदाची परीक्षा पुन्हा घेण्यात येईल. त्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे.

गट ‘क’ पदाच्या परीक्षेचा पेपरही अशाच प्रकारे काही लोकांपर्यंत परीक्षेपूर्वी पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे, असा अंदाज पोलिसांनी तपासाअंती वर्तवला आहे. दोन्ही परीक्षा पुन्हा घेण्याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा झाली असून आम्ही लवकरच याबाबत नियोजन करू, असे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी पिंपरी-चिंचवड येथे पत्रकारांशी बाेलताना व्यक्त केले.

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, मंत्रिमंडळाने टाटा इन्स्टिटयूट किंवा एमकेसीएल कंपनीकडे परीक्षा घेण्याचे कंत्राट देण्यात यावे आणि ऑनलाइन परीक्षा घेण्यात यावी, असा निर्णय घेतला आहे. काही नामांकित संस्थांकडून ऑनलाइन स्वरूपात परीक्षा घ्या, अशीही मागणी करण्यात येत आहे. जीएडी विभागाने परीक्षा घेण्याचा आदेश दिल्यानंतर लगेच परीक्षेची तयारी सुरू केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here