अहमदपुर शहरात ज्येष्ठ नागरिकांची घरोघर जाऊन आरोग्य तपासणी…

अहमदपूर व चाकूर – बालाजी तोरणे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पन्नास वर्ष वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांची महसूल विभाग व अहमदपूर नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आज घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी केली जात आहे.

अहमदपूर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जेष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी घरोघर जाऊन करण्याचे आदेश मा.जिल्हाधिकारी यांनी दिल्या नूसार हे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे.
या सर्व्हेक्षणाबाबत काल तहसील कार्यालय येथे सदरील कामाचे प्रशिक्षण संपन्न झाले.

यात तहसीलदार महेश सावंत मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर,कार्यालयीन अधीक्षक सतीश बिल्लापट्टे,तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.दासरे आदींनी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले.

आज सकाळी पासून 60 कर्मचारी, 32 केंद्र अधिकारी आणि यांच्यासोबत सहाय्यासाठी प्रत्येकी एक सहशिक्षक देण्यात आलेले असून या पथकाच्या माध्यमातून अहमदपूर शहरातील मतदार यादी घेऊन घरोघर भेट देवून आरोग्य तपासनी केली जात आहे.

यात पन्नास वर्ष वयोगटाच्या जेष्ठ व्यक्तींची आरोग्य तपासणी केली जात आहे.तसेच प्रामुख्याने थर्मल स्कॅनरच्या माध्यमातून व्यक्तीच्या शरीराचे तापमान तपासनी करणे,कोरोणा बाबतीत सुरक्षेचे उपाय योजना सांगणे आदी गोष्टी या पथकामार्फत केल्या जात आहेत.

आज साधारणतः पंधरा हजार आणी उद्या पंधरा हजार एवढ्या घरांना भेट देऊन दोन दिवसाचे हे सर्वेक्षण पूर्ण केले जात आहे.या कामी नागरीकांनी सहकार्य करावे असे अवाहन तहसिलदार महेश सावंत, मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर,कार्यालयीन अधिक्षक सतिश बिल्लापट्टे,आरोग्य अधिकारी डाॅ.दासरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here