फेसबुक वरून मैत्री करून लग्नाचे आमिष दाखवून ४ वर्ष केले शारीरिक शोषण…बलात्काराचा गुन्हा दाखल…अद्याप आरोपी मोकाट…

बुलढाणा प्रतिनिधी – अमरावती जिल्ह्यातील एका बेसहारा मुलीला फेसबुक वरून मैत्री करून लग्नाचे आमिष दाखवून 4 वर्ष शारीरिक शोषण करणाऱ्या बुलढाणा च्या अंभोडा येथील मोहन तायडे विरुद्ध 29 मे ला बलात्कार सह इतर गुन्हा दाखल झाला मात्र गेली 3-4 महिन्यापासून पोलिसांना ह्या आरोपीला साधं ताब्यातही घेता आल नाही.

त्यामुळे या पीडित युवतीला न्यायासाठी दारोदार भटकण्याची वेळ आली आहे. आरोपी मोहन तायडे हा बिहार पोलिसात SSB ला नोकरीला असून या पीडितेला सर्वच बाजूने त्रास देण्याचा प्रयत्न करतोय..

एवढंच काय तर तिला जीवे मारण्याचा प्रयत्न सुद्धा केला गेलाय.. मात्र हे प्रकरण बुलडाणा पोलिसांकडे असल्याने त्यांनी अद्याप आरोपीला साधी अटकही केली नाही.. त्यामुळे या बिन माय बापाच्या मुलीला न्यायासाठी दरदर भटकाव लागत आहे..

ह्या संपूर्ण प्रकरणी आरोपीला अटक पूर्व जामीन मिळावा यासाठी सर्व यंत्रणा हातभार लावत आहे की काय अशी परिस्थिती आहे..त्यामुळे या राज्यात गरिबाला न्याय मिळेल का हा प्रश्नच आहे……

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here