नरखेड तालुक्यातील मोवाड येथे जुनी वस्ती येथील मदिर परिसरात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली…

नरखेड – अतुल दंढारे

प्राप्त माहिती नुसार नितीन उत्तमराव बोबडे वय 30 वर्ष रा .वार्ड न .06 मोवाड याने मध्यरात्री सुमारास जुनी वस्ती येथे गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.या घटनेची माहिती सकाळी सात च्या सुमारास भेटली तसेच मोवाड पोलीस चौकी कर्मच्यारी तिथे उपस्थित झाले.

उत्तरीय तपासणी साठी शव नरखेड येथे नेण्यात आले.पोलीस पंचनामा करण्यात आला.तरुण हा काही महिन्या अगोदर नागपूर येथे कामकरीता कंपनीत गेला होता असे सांगण्यात आले.मागील लॉकडाउन काळात त्याने भाजीपाला विकण्याचा व्यवसाय केला होता .त्याच्या पाश्च्यात आई वडील बहीण भाऊ आहे.आई वडील मोल मजुरी करुन उदरनिर्वाह करतात .भाऊ आणि बहिणीचे लग्न झाले.

आत्महत्येचे कारण अजुन कळले नाही.त्याच्या विरुध्द भा .द .वी कलम 174 नुसार मर्ग गुन्हा नोंदविण्यात आला .पुढील तपास मोवाड चौकीचे इन्चार्ज बोथले उप.महानिरीक्षक नरखेड , साहेबराव मसराम जमादार , नीलेश खरडे पोलीस शिपाई करतं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here