उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यात प्रियकरासह पत्नीची हत्या करण्याच्या हेतूने व्यक्तीने आपल्याच पत्नीचा शिरच्छेद केला असून यात महिलेचा प्रियकर गंभीर जखमी झाला.यानंतर पतीने महिलेचे विच्छेदलेले डोके घेवून बाजारातून पैदल जात पोलिस स्टेशन गाठले.
बाबेरू कोतवाली भागात नेतानगर येथे राहणाऱ्या किन्नर यादवने शेजारी राहणाऱ्या रवीला (वय 35) याला आपल्या घरी बोलावले आणि आज पहाटे साडेसहाच्या सुमारास त्याच्यावर कुर्हाडीने हल्ला केला. रवीला त्याच्या कानशिलावर आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा आहेत.
यानंतर किन्नरने पत्नी विमला (वय 35) याच्यावरही कुऱ्हाडीने वार केले. तिने आपला जीव वाचवण्यासाठी जखमी अवस्थेत शेजारच्या घरात शिरली असता पतीनेही घरात जबरदस्तीने घुसून पत्नीच्या मानेवर कुर्हाड घालून मुंडक वेगळे केले.
आरोपी पती किन्नरने एका हातात कुर्हाड घेतली आणि दुसऱ्या हातात पत्नीचे मुंडके घेवून घटनास्थळापासून दीड किलोमीटर अंतरावर पोलीस ठाण्यात पोहोचला आणि आत्मसमर्पण केले. दरम्यान, जखमी रवीला सीएचसी येथून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृतीही चिंताजनक असल्याचे सांगितले जाते.
या घटनेमुळे पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. ही घटना अवैध संबंधांवर घडल्याची चर्चा आहे. त्याच संशयामध्ये किन्नरने आपली पत्नी विमालाची हत्या केली आणि आरोपी प्रियकर रवीलाही ठार मारनार होता.