अकोला शहरात पावसाचा हाहाकार…पाहा व्हिडीओ…

अकोल्यात संध्याकाळपासून जोरदार ते अति मुसळधार पाऊस झाल्याने शहरातल्या मोर्णा नदीला मोठा पूर आला…

मोर्णा नदीच्या पुरामुळे लोकांमध्ये एकच धावपळ झाली लोकांनी कसेबसे आपले जीव वाचवले…अकोला शहरात रात्री आठच्या सुमारास आलेल्या मुसळधार पावसाने अनेकांचे संसार ध्वस्त केले…

मोर्णा नदी आपल्या धोक्याच्या पातळीपेक्षा चार ते पाच फुटाणे वाहत असून नदीकाठच्या लोकांच्या घरांमधील घरगुती साहित्यासह कपडे व काही वस्तू वाहून गेलीत…

अकोला शहरातील अनेक भागात पावसाचे पाणी घरांमध्ये शिरल्याने वेळीच लोकांनी या मधून आपला जीव वाचवला…

खडकी ,डाबकी रोड, जुने शहर, घुसर ,मोठी उमरी ,रतनलाल प्लॉट, तसेच जवाहर नगर, गोकुळ कॉलनी ,प्रसाद सोसायटी, गोइंका लेआउट, मुकुंद नगर,आदीं भागांमध्ये लोकांच्या घरामध्ये पाणीच पाणी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here