डोक्यावर प्रकाशकंदील अन काखेतील झोळीत बाळ…वरातीत चालणाऱ्या आईला हर्ष गोयंका म्हणाले- ‘तुम्हाला सलाम…

न्यूज डेस्क :- बिझनेसमन हर्ष गोएंका सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. ते मजेदार ट्विट आणि विनोद शेअर करुन त्यांच्या चाहत्यांचे मनोरंजन करतात. यावेळी त्याने एक हृदयस्पर्शी चित्र शेअर केले आहे.

जिथे एका बाई डोक्यावर प्रकाशकंदील घेतलेला अन काखेतील झोळीत बाळ घेऊन वराच्या मागे वरातीत चालत आहे. ट्विटरवर या चित्राचे वर्णन अत्यंत भावनिक केले असून आईच्या धैर्य व कष्टास सलाम केला.

वरातीच्या मिरवणुकीत घोडीवर नवरदेव बसलेला असल्याचे चित्रात दिसते. त्याचवेळी, एक स्त्री डोक्यावर प्रकाशकंदील ठेवून चालत आहे. तीच्या खांद्यावर एक झोळी टांगलेली आहे, ज्यामध्ये लहान मुल झोपले आहे.

हे चित्र शेअर करताना हर्ष गोयंका यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ” मला वाटते कधीकधी मी खूप कष्ट करतो आणि नंतर मी हे चित्र पाहिले. माझा सलाम या आईला…

त्यांनी २१ मार्चच्या संध्याकाळी हे चित्र शेअर केले आहे, आतापर्यंत १३ हजाराहून अधिक लाईक्स आणि दीड हजार री-ट्वीट झाले आहेत. कमेंट सेक्शनमध्ये बॉलिवूड अभिनेत्री सिमी गैरेवाल यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यानी लिहिले, ‘आणि तीही मुलाला बॅगमध्ये घेऊन जाते.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here