हार्दिक पांडयाच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन…

न्यूज डेस्क – भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू हार्दिक पद्याच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शनिवारी सकाळी वडील हिमांशू पंड्या यांना हृदयविकाराचा झटका आला. त्याच वेळी कुणाल पांड्या बडोदा संघ सोडून घरी निघून गेला. तो सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत खेळत होता.

कृणाल त्याच्या कुटूंबाकडे गेला आहे आणि यामुळे तो या स्पर्धेत आणखी खेळू शकणार नाही. बडोदा क्रिकेट असोसिएशनचे (बीसीए) मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर हातंगडी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तो बडोद्याच्या टीमचा कर्णधार आहे. तर हार्दिक पांड्या ही स्पर्धा खेळत नाहीये. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वनडे आणि टी-20 सीरिज खेळून हार्दिक पांड्या घरी परतला.

हार्दिक आणि कृणाल यांच्या यशामध्ये हिमांशू पांड्या यांची भूमिका मोलाची राहिली. हिमांशू सुरतमध्ये छोटा कार फायनान्सचा व्यवसाय करायचे, पण मुलांना क्रिकेटपटू बनवण्यासाठी त्यांनी बडोद्याला स्थायिक व्हायचा निर्णय घेतला.

बडोद्यामध्ये सुरतपेक्षा क्रिकेटची चांगली सुविधा आहे, त्यामुळे हिमांशू यांनी आपला व्यवसायही बंद केला. मुलांना क्रिकेटपटू बनवण्याच्या निर्णयावर काही नातेवाईकांनी प्रश्न उपस्थित केले होते, पण आम्ही विश्वास ठेवला, असं हिमांशू पांड्या एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here