हाथरस बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशी द्या…निपाणी तहसीलदारांना निवेदन…

राहुल मेस्त्री

उत्तर प्रदेशच नाही तर संपूर्ण देशाला हदरवुन टाकणारी घटना उत्तर प्रदेश मधील हाथरस येथे घडली आहे. एकोणीस वर्षीय मुलीवर काही नराधमांनी सामुहिक बलात्कार करून तिची जिभ कापून त्याचबरोबर मानेचा मनकाही मोडला आहे.

यामध्ये पिडीतला आपला जिव गमवावा लागला असुन याचे पडसाद संपूर्ण देशात उमटले आहेत. या अमानवी कृत्याच्या निषेधार्थ कर्नाटकच्या,बेळगाव जिल्ह्यातील निपाणी तालुक्यातील विविध आंबेडकरी संघटनेच्या वतीने दोषींना कडक कारवाई करून फाशीची शिक्षा व्हावी या मागणीचे निवेदन निपाणी तहसीलदार यांना देण्यात आले.

यावेळी आंबेडकर विचार मंच अध्यक्ष प्रा.सुरेश कांबळे म्हणाले पीडितेचा मृतदेह तिच्या कुटुंबाला न दाखवता सरकारच्या आदेशाने परस्पर जाळला हे निंदनीय आहे. तर जेष्ठ विधिज्ञ अविनाश कट्टी आणि डॉ श्रीकांत वराळे यांनीही आपले मनोगत व्यक्त करून घटनेचा निषेध केला. सदर निवेदन उपतहशिलदार अभिजित भोंगळे यांनी स्विकारले.

याप्रसंगी डॉ.आंबेडकर विचार मंच निपाणी, ऑल इंडिया आरपीआय दलित संघर्ष समिती ,भारतीय बौद्ध महासभा, दलित महासंघ अण्णाभाऊ साठे तरुण मंडळ ,भिम सेना युवा मंच, भटक्या-विमुक्त गोसावी संघ, कर्नाटक डोंबार महासंघ यांच्या सह विविध आंबेडकरी चळवळीतील शेकडो सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here