सप्तशृंग गडावर देवी भक्तांची मांदियाळी…

नाशिक – सप्तश्रुंगी गड, वणी

अखंड महाराष्ट्रचे आराध्यदैवत आणि साडेतीन शक्ती पिठा पैकी एक स्थान महात्म्य म्हणजे वणी गडावरील सप्तश्रुंगी देवी होय. उत्तर महाराष्ट्रातील खान्देश परिसरातून अनेक देवी भक्त गण नवरात्रीनिमित्त सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी येत असतात. दिनांक 7 ऑक्टोंबर पासून राज्य शासनाने राज्यातील मंदिरे खुली केली आहेत. त सप्तशृंगी गडावरील सप्तशृंगी देवी ही अनेक भक्तांचे आराध्यदैवत आहे.

सलग नऊ दिवस येथे हजारो भक्तांची देवीच्या दर्शनासाठी गर्दी जमत असते आज सुद्धा विजयादशमी निमित्ताने आणि नवरात्र संपन्न म्हणून अनेक देवी भक्तांनी आज मंदिरात हजेरी लावली होती. या देवीचे नेहमीप्रमाणे साजशृंगार आरती करण्यात आली.

भक्तांच्या नवसाला पावणारी, त्यांच्या हाकेला ओ देणारी सप्तशृंगी देवीचे हे स्थान आणि भक्तांच्या मनामध्ये रुजलेले आहे. पुरातन काळात महिषासुराचा वध करुन देवी या ठिकाणी सप्तशृंगी गडावर कायमस्वरूपी वसलेली आहे अशी आख्यायिका मानली जाते. सदर माहिती देवीचे पुजारी श्री नारायण देशमुख यांनी उपलब्ध करून दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here