कंबालपेटा चेक येथील हातपंप अनेक दिवसांपासून लीक : ग्रामपंचायतचे दुर्लक्ष…

गावकऱ्यांना प्यावे लागते दूषित पाणी…

सिरोंचा – साईनाथ दुर्गम

पाणी म्हणजे जीवन असे म्हटले जाते. पण हेच पाणी दूषित असेल तर ते जीवनदायी ठरण्याऐवजी मरणदायी ठरू शकते. अनेक जलजन्य आजारांच्या उद्रेकास कारणीभूत ठरणाऱ्या दूषित पाण्याचे प्रमाण खेड्या गावामध्ये खूप आहे.

तसेच दृष्य मागील बऱ्याच दिवसापासून सिरोंचा तालुक्यातिल मादाराम रै ग्रापपंचायत अंतर्गत कंबालपेटा मध्ये बघायला मिळत आहे. या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या खूप गंभीर असून गावातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी खूप धडपड करावी लागते.

तासनतास हातपंपावर पाणी येत नाही गेल्या एक वर्षापासुन हा हात पंप कराब झालेला आसुन पाणी आणण्याकरिता एक किलो जावुन आनावे लागतो. गावाच्या बाहेर एक किलोमीटर अंतरावरएक नाला असुन त्या नालाचा पाणी पिण्याच्या पाणी म्हणुन आनावा लागत आहे.

त्या नालाचा पाण्याने संपुर्ण गाव आपली तहान भागवत असतो मात्र हातपंपाचे दुरस्ती मागील बऱ्याच दिवसापुन लीक आहेत त्याकडे मात्र ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गावोगावी पिण्याच्या पाण्याची मुबलक प्रमाणात सोय उपलब्ध आहे.

मात्र कंबालपेटा मध्ये पाण्यासाठी खूप वणवण करावी लागते. हे सगळी दृश्य ग्रामपंचातला दिसत नसेल कि प्रशासन ग्रामपंचायतला निधी पुरवठा करीत नसेल असा प्रश्न गावकऱ्यांपुढे निर्माण होत आहे. शासनाच्या विविध प्रकारच्या पाणी पुरवठा योजना आहेत. त्या गावामध्ये उपलब्ध करून द्याव्या व मुबलक प्रमाणात फिल्टर युक्त पाणी पुरवठा करावा अशी मागणी गावकरी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here