मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदला पाकिस्तानच्या कोर्टाने सुनावली १० वर्षांची शिक्षा…

न्यूज डेस्क – मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदला पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी कोर्टाने गुरुवारी कोर्टाने १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार आणि कुख्यात दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा आणि जमात-उद-दावाचे प्रमुख हाफिज सईदला दहशतवादी निधी प्रकरणात साडेदहा वर्षांची शिक्षा सुनावली.

कोर्टाने जफर इक्बाल व याह्या मुजाहिद यांना प्रत्येकी 10 वर्षांची शिक्षा सुनावली. हाफिज अब्दुल रहमान मक्की याला सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. यापूर्वी कारवाईच्या भीतीने एफएटीएफमध्ये हाफिज सईदच्या कारवायांवर बंदी घालण्यात आली होती. शिक्षेदरम्यान न्यायालयात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला, हाफिज सईद आणि त्याच्या काही साथीदारांना 11 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

यापूर्वी पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी कोर्टाने हाफिज सईदच्या प्रवक्त्यास 32 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. जमात-उद-दावाचे प्रवक्ता याहा मुजाहिद होते. टेरर फंडिंग प्रकरणात ही शिक्षा आली आहे. कोर्टाने जमात-उद-दावाशी संबंधित इतर दोघांनाही शिक्षा सुनावली. त्यात हाफिजचा पुतण्या प्रोफेसर हाफिज अब्दुल रहमान मक्की यांचा समावेश होता. त्याला एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली.

हाफिज सईदच्या नेतृत्वात 2008 मध्ये मुंबईत झालेला हल्ल्याचा प्लान पाकिस्तानमध्ये बनविला होता. या हल्ल्यात 10 दहशतवाद्यांनी मुंबईतील 166 नागरिकाना ठार तर शेकडो लोक जखमी केले. त्यानंतर हाफिज सईदला संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेने “जागतिक दहशतवादी” घोषित केले. त्याच्या डोक्यावर 10 दशलक्ष डॉलर्सची इनाम ठेवला होता. गेल्या वर्षी जुलैमध्ये हाफिज सईदला आंतरराष्ट्रीय दबाव असलेल्या दहशतवादी फंडिंग प्रकरणात अटक केली होती. पाकिस्तान अ‍ॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) च्या दबावाखाली ही कारवाई केली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here