कोगनोळी येथील मराठी शाळा नजीकची आरसीसी गटार कोसळली…

कोगनोळी – राहुल मेस्त्री

कोगनोळी तालुका निपाणी येथील मराठी मुला मुलींची शाळा नजीक असणाऱी सुमारे 40 ते 50 फूट आरसीसी गटार कोसळल्याचे निदर्शनास आले आहे. सदर गटार तीन ते चार वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीच्या उद्योग खत्री योजनेतून बांधलेली होती.लाखो रुपये खर्च करून बांधलेली ही आरसीसी गटार इतक्या लवकर कशी काय पडली त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे का? असा प्रश्न येथील नागरिकांना पडलेला आहे.

सदर गटारी मध्ये पाण्याचा प्रवाह मोठयाप्रमाणात असून बाजारपेठ पासून व वार्ड क्रमांक एक मधील मुसलमान गल्ली येथून मोठ्या प्रमाणात सांडपाणी या मुख्य गटारीला जोडलेले आहे .ही गटार कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात गटारीचे पाणी रस्त्यावर येण्याची शक्यता आहे.

तर या पडलेल्या गटारीचे पडसाद दिनांक 16 रोजी ग्रामपंचायतीच्या जनरल मिटिंग मध्ये पडले असून भाजप पुरस्कृत ग्रामपंचायत सदस्यांनी याबाबत मीटिंगमध्ये गदारोळ केला.व सदर गटार आहे त्या रकमेतून कॉन्ट्रॅक्टरनी बांधावी अन्यथा ग्रामपंचायतीसमोर आंदोलनाचा इशारा ग्रामपंचायत सदस्य सुनिल माने यांनी दिला.

या पडलेल्या गटारी मुळे या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी येथील नागरिकांच्या मधून दबक्या आवाजात येत आहे. तर गेल्या पंचवार्षिक कालावधीतील ग्रामपंचायतीकडून केलेल्या निकृष्ट कामाचं एक उत्तम उदाहरण ही पटलेली गटार आहे.

अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते सचिन परीट यांनी दिली. याबाबत गटार बांधलेले कॉन्ट्रॅक्टर तात्यासो कागले यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की चार महिन्यापूर्वी मराठी शाळेतील गटारी नजीकची असलेली मोठी वृक्षे तोडते वेळी सदर गटारी वर आदळल्याने ही गटार कोसळली असल्याची प्रतिक्रिया दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here