पातूर येथे 73 हजाराचा रुपयाचा गुटखा आरोपीसह जप्त…एका आरोपीस अटक…

पातुर तालुका प्रतिनिधी
पातूर पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार 27 जानेवारी गुरुवार रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान गुप्त बातमी दाराकडून मिळालेल्या माहितीनुसार काशीदपुरा येथे एक इसम अवैधरित्या विनापरवाना सुगंधित तंबाखू गुटखा पुडी विक्री करीत आहे अशा खात्रीलायक बातमी वरून पोलीस निरीक्षक यांना माहिती देऊन दोन पंचासमक्ष पीएसआय मीरा सोनुने पोलीस हेडकॉन्स्टेबल दिलीप इंगळे पो.काँ. सत्यजित ठाकूर पो.काँ. मयूर उमाळे मपोकाँ सोनाली राठोड असे खाजगी वाहनाने काशीदपूरा पातूर येथे जाऊन पाहणी केली असता एक इसम आपल्या दुकानांमध्ये सुगंधित गुटका तंबाखू विक्री करीत असल्याचे दिसून आले .

यावरून आम्ही पथकाने दुकानात रेड केली असता विमल पान मसाला छोटे पाऊच 336 प्रत्येकी किंमत दीडशे रुपये एकूण किंमत 50 हजार 400 रुपये व सुगंधित तंबाखू 275 पाकिटे प्रत्येकी किंमत तीस रुपये असा एकूण आठ हजार दोनशे पन्नास रुपये तसेच सुगंधित तंबाखू 200 पाकीट प्रत्येकी किंमत बावीस रुपये एकूण किंमत चार हजार चारशे रुपये तसेच सुगंधित पाकिटे निळ्या रंगाचे शंभर पाकिटे किंमत प्रत्येकी सहा रुपये वाह डब्ल्यू चेविंग तंबाखू 460 पाकीट.

प्रत्येकी किंमत पंधरा रुपये असा एकूण सहा हजार 900 रुपये नंतर नजर गुटका बारा पाकीट प्रत्येकी दोनशे रुपये किंमत दोन हजार चारशे रुपये असा एकूण 72 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल आरोपी जवळ मिळून आल्याने सदर चा माल दोन पंचांसमक्ष घटनास्थळावरून जप्ती पंचनामा प्रमाणे जप्त करण्यात आला असून आरोपीस शेख मुस्ताक अब्दुल जब्बार वय 31 वर्षे राहणार काशिदपुरा पुरा पातुर या आरोपी स अटक करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार हरीश गवळी यांच्या मार्गदर्शनात पातूर पोलिस करीत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here