गुरुद्वारा बोर्ड अस्थाई कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा…

लखन सिंघ लांगरी यांची मागणी

नांदेड – महेंद्र गायकवाड

गुरुद्वारा तखत सचखंड बोर्ड संस्थेतील अस्थाई कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता स. लखन सिंघ लांगरी यांनी बोर्डाचे अध्यक्ष स. भूपिंदर सिंघ मिनहास यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गुरुद्वारा बोर्डात मागील चार ते पाच वर्षांपासून कर्मचारी अस्थाई रूपाने कार्यरत आहेत. दिवसंदिवसं वाढती महागाई आणि कोरोनाच्या अनिश्चित काळात कर्मचारी व त्यांचे कुटुंब प्रभावित झाले आहे.

जवळपास सहा महिन्यापूर्वी देखील निवेदन देऊन कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी करण्यात आली होती आणि बोर्ड अध्यक्ष भूपिंदरसिंघ मिनहास यांनी लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले होते. या वेळी ही त्यांनी तसे आवाहन दिले आहेत.

येत्या बोर्ड बैठकीत अस्थाई कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात येईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. जर वरील मागणी मान्य झाली नसल्यास भविष्यात आंदोलन करण्यात येईल असा इशारा लखन सिंघ लांगरी यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here