प्रभाग क्रमांक आठमध्ये गुंठेवारी नियमितीकरण मार्गदर्शन शिबिर संपन्न…

सांगली – ज्योती मोरे

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक आठ मधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे गुंठेवारी पूर्व मार्गदर्शन शिबिराचा आयोजन नगरसेवक विष्णू माने यांनी केलं होतं या शिबिराचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला यवेळी शिबिराची पाहणी अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांडगे यांनी केली.

यावेळी नगरसेवक विष्णू माने नगररचना अधिकारी विनायक झगडे श्रीयुत काकडे नगरसेवक राजेंद्र कुंभार कल्पना कोळेकर महेश सागरे मकानदार संजय कांबळे आजम जमादार इतर कर्मचारी उपस्थित होते.

दिनांक 24 व 25 नोव्हेंबर रोजी गुंठेवारी नियमितीकरण महाराष्ट्र शासनाच्या नवीन अध्यादेश मान्यतेनुसार दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात शिबिर आयोजित करण्यात आले आहे. एकदा वाचलं आवश्यक कागदपत्रे घेऊन नागरिकांनी या ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहनही नगरसेवक विष्णू माने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here