सुधारीत तंत्रज्ञानाचा वापर करून ज्वारीचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन…

राजगुरूनगर ( पुणे ) – महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानच्या माध्यमातून पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमाअंतर्गत ज्वारीचे उत्पादन वाढवण्यासाठी खेड तालुक्यातील खेड मंडल मधील जैदवाडी या गावाची निवड करण्यात आली आहे.

यावेळी कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना ज्वारीच्या पिकाविषयी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादकता कशी वाढवावी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
खेड तालुका कृषी विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या जैदवाडीमध्ये १६०.७० हे पर्यंत ज्वारीचे क्षेत्र असून,येथील शेतकऱ्यांना ज्वारीच्या पिकाविषयी माहीती देऊन,

ज्वारी उत्पादन कसे वाढवण्यात यावी यासाठी तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब मांदळे,अतिरिक्त मंडल कृषी अधिकारी राम वाळुंज,जैदवाडी कृषी सहाय्यक अधिकारी श्रीमती कविता रोडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

पौष्टिक तृणधान्य या कार्यक्रमाअंतर्गत जैदवाडीमध्ये १० हेक्टर क्षेत्रावर हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे.शेतकऱ्यांना फुले सुचित्रा ज्वारी बियाणांचे वाटप करण्यात आले.ज्वारी बिज प्रक्रिया,बी,बी,एफ यंत्राने पेरणी,खत व्यवस्थापन आदी विषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी सरपंच शीतल जैद,उपसरपंच मचिंद्र कोतवाल,पोलीस पाटील गणेश जैद,कृषिमित्र आनंदा जैद,प्रगतशील शेतकरी गंगाधर जैद,भगवन्त जैद,सुभाष जैद आदी शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here