बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांडातील आरोपी गुड़िया शाहु ला ‘कोविड -19’ च्या आधारे हायकोर्टाने दिला तात्पुरता जामीन…

शरद नागदेवे, नागपूर.

नागपुर : बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांडातील महिला आरोपी गुड़िया शाहु चा टेम्पररी (तात्पुरता ) जामीन मा. हायकोर्टाने ‘कोविड 19’ संसर्ग आजार पसरत असल्यामुळे मंजुर केला आहे. आरोपीच्या याचिकेत असे म्हटले की, नागपूरच्या मध्यवर्ती कारागृह येथे कर्मचारी अधिकारी तसेच कैदी अशा 44 लोकांना कोरोना पॉजिटीव झालेला आहे.

करीता गुड़िया शाहु व तिच्या 19 महिन्याच्या मुलाला कोरोनाचा संसर्ग होवु नये म्हणुन तात्पुरता जामीन देण्यात यावा.मा. न्यायमुर्ती ए.एस.चांदुरकर व मा. न्यायमूर्ती अनिल एस. किलोर यांच्या बेंचने हा आदेश दिला आहे.

महत्वाचे म्हणजे 30 जून 2020 रोजी मा.उच्च न्यायालय नागपुर खंडपीठ च्या मा. न्यायमुर्ती ए.एस.चांदुरकर व मा. न्यायमुर्ती अनिल एस. किलोर यांच्याच बेंचने गुड़िया शाहु ची जामीन याचिका फेटाळली होती.

त्यानंतर तात्काळ आरोपीच्या वकीलांनी ‘कोविड 19’ चा आधार घेऊन गुड़िया शाहु चा ऑनलाईन जामीन अर्ज लावला. त्यामुळे तिला तात्पुरता जामीन महत्वाच्या अटीं वर देण्यात आला.

तसेच हुडकेश्वर पोलिस स्टेशन मध्ये सोमवार व शुक्रवार रोजी सकाळी 10 ते 11 चे दरम्यान हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले व सरकारला आपले म्हणणे 17 जुलै पर्यंत सादर करण्यास सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here