स्वारातीम विद्यापीठातील राज्यव्यापी आंदोलनास वाढता पाठिंबा; तिसऱ्या दिवशी १०० टक्के कामकाज बंद…

नांदेड – महेंद्र गायकवाड

महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीतर्फे सुरु करण्यात आलेल्या राज्यव्यापी लेखणीबंद /अवजार बंद आंदोलनामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, उपपरिसर परभणी, लातूर यासह न्यू मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोली येथील शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आजच्या तिसऱ्या दिवशीही शंभर टक्के बंद पाळून यशस्वीरित्या पार पडला. आज शनिवार, दि.२६ सप्टेंबर, २०२० रोजी अनेक मान्यवरांनी विद्यापीठातील आंदोलनास भेट देऊन पाठिंबा दर्शविला.

नायगाव मतदारसंघाचे आ.राजेश पवार यांनी आंदोलन कर्त्यांची आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांची भेट घेतली. यावेळी ते मार्गदर्शन करताना म्हणाले की, आम्ही आपल्या पाठीशी आहोत. आपल्याला जोपर्यंत सातवा वेतन आयोग मिळणार नाही आणि आपल्या मागण्यापूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत आपल्यासोबत लढा देऊ, शासनाचा जाब विचारु. आपल्या मागण्यापूर्ण होण्यासाठी आम्ही आपणास सर्वोत्तपरी सहकार्य करू, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

नांदेड उत्तरचे आ.बालाजीराव कल्याणकर यांनीही आंदोलन कर्त्यांची आणि कुलगुरु डॉ.उध्दव भोसले यांची भेट घेतली. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, मी लवकरच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी संपर्क साधून, आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी त्यांना विनंती करतो. लवकरच मंत्री महोदय यावर तोडगा काढून आपले समाधान करतील, अशी अपेक्षा करतो.

नांदेड युवक कॉंग्रेसचे विठ्ठल पावडे, नांदेड जिल्हा एनएसयुआयचे अध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी आपल्या विद्यार्थ्यांसह आंदोलन भेट देऊन त्यांनी कुलगुरु डॉ.भोसले यांची भेट घेतली. कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी आपण हे आंदोलन सुरू केले असून, यास विद्यार्थ्यांचा पाठिंबा आहे, असे यावेळी त्यांनी सांगितले.

विद्यार्थी सेनेची नांदेड जिल्हाध्यक्ष माधव पावडे यांनी या आंदोलनास पाठिंबा देऊन आपल्या न्याय मागण्यासाठी विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करुन आपल्या मागण्या पूर्ण करून घेऊ, असे आश्वासन दिले.

यावेळी वंचित बहुजन आघाडी नांदेडचे जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगोले आणि महासचिव श्याम कांबळे यांनी आंदोलन कर्त्यास भेट दिली. आणि आंदोलनास पाठिंबा देऊन वंचित बहुजन आघाडी मार्फत जनआंदोलन पुकारण्याचे आश्वासित केले.आजच्या आंदोलनाची सुरुवात विद्यापीठ गिताने झाली तर सांगता राष्ट्रगिताने झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here