अहमदपूर – बालाजी तोरणे
अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील महात्मा फुले महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ भारत भदाडे तर प्रमुख उपस्थिती रासेयो चे कार्यक्रमाधिकारी प्रा बालाजी आचार्य ,प्रा बी व्ही पवार, प्रा संजय जगताप, प्रा सदाशिव वरवटे प्रा विठ्ठल चव्हाण ,प्रा अजय फड, प्रा प्रभाकर स्वामी,प्रा डॉ विरनाथ हुमनाबादे,
प्रा आनंत सोमवंशी, प्रा डॉ दर्शना कानवटे,किशन धरणे यांची होती यावेळी स्वामी रामानंद तिर्थ यांच्या प्रतिमेचे पुजन प्राचार्य डॉ भदाडे, उपस्थीत प्राध्यापक, कर्मचारी यांच्या शुभहस्ते करून विनम्र अभिवादन करण्यात आले त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांनी अत्यंत तातडीचे परिपत्रक काढून पदवी परीक्षा बी ए तृतीय वर्ष बॅकलॉग आणि रेग्युलर विद्यार्थ्याच्या दि ७ आक्टोबर पासून घेण्याचे निर्देश दिले.
त्या अनुशंगाने मिटिंग संपन्न होऊन परीक्षा सुरळीत संपन्न करण्याचे ठरले जि प प्रा शाळा दगडवाडी येथे स्वामी रामानंद तीर्थ यांना विनम्र अभिवादन किनगांव पासून जवळच असलेल्या दगडवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता ३री व ४ च्या विद्यार्थ्यांना तोंडाला मास्क लाऊन अंतरावर बसून शाळेतील मुख्याध्यापक श्री माधवराव मरनांगे सहशिक्षिका वंदना कांबळे यांनी,
ज्ञानदानाचे धडे देऊन 3 ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जंयती निमित्य प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले आणि स्वामी रामानंद तिर्थ यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला यावेळी शाळेतील कु भाग्यश्री मुंडे ,कु पूजा मुंडे , कु राधा सोनवणे, कु सरस्वती मुंढे ह्या विद्यार्थीनी उपस्थीत होत्या.