कोगनोळीत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन…

कोगनोळी – राहुल मेस्त्री

यंदाही कोरोणाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रयतेचे राजे,आठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना करणारे महामानव छत्रपती शिवाजी महाराज यांची कोगनोळी ता.निपाणी येथे तिथीप्रमाणे होणारी शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.

प्रारंभी कर्नाटकचे माजी उर्जा मंत्री विरकुमार पाटील यांच्या हस्ते येथील शिवस्मारक सांस्कृतिक भवनमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतण्याला हार अर्पण करण्यात आले.त्याचबरोबर माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील,माजी ता.पं.सदस्य बाळासाहेब कागले, मराठा मंडळ उपाध्यक्ष उमेश पाटील यांनी देखील छत्रपती शिवरायांना अभिवादन केले.

यावेळी के डी पाटील सर,दिलिप पाटील,धनाजी पाटील,तात्यासो कागले,युवराज कोळी,अनिल पाटील सर,शाम पाटील,विनायक गायकवाड,संजय डुम,प्रकाश गायकवाड,ललन डोंगळे यांच्या सह अनेक शिवभक्त उपस्थित होते.

तर कोगनोळी ग्रामपंचायत मध्येही छत्रपती शिवराय आणि महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी छत्रपती शिवराय आणि बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेस हार अर्पण आप्पासाहेब खोत आणि तात्यासो कागले यांनी केले.

याप्रसंगी महेश जाधव,प्रशांत पोवाडे,सुनील माने,सुजीत माने,कुमार व्हटकर,प्रवीण भोसले,सचिन परीट,राजु शिंत्रे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी शिवलिंग दिवटे,शर्मिला हळीज्वाळे,रामराव जाधव,संजय कुभांर,उज्वल शेवाळे,सतिश दाभाडे,रमेश सांगावे आदी उपस्थित होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here