सर्व नियमांचे पालन करत घरातच बाबासाहेबांना केले अभिवादन..!

बुलढाणा – अभिमान सिरसाट

बुलढाणा जिल्ह्यातील, देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथे सामाजिक बांधिलकी जोपासणारे पत्रकार अंबादास बुरकुल यांचे घरी महामानव, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वि जयंती कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत साजरी करण्यात आली.

कायदेपंडित बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतेवेळेस ज्या महामानवाने देशाला घटना दिली, कायदे बनवले. त्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी सर्वांनी कायद्याचे पालन करणे हे जरुरी आहे. तरच महामानवाला ,कायदेपंडिताला खरे अभिवादन ठरेल !

त्यामुळे आंबेडकरी विचारांचा आदर करत सामाजिक बांधिलकी जोपासणारे पत्रकार अंबादास बुरकुल यांच्या विनंतीला मान देत गावातील रमेश खिल्लारे ,बाबुराव साळवे, किरण जोगदंड, भास्कर मोरे ,सुनील हिवाळे, शिव मल्हारी बुरकुल ,गौरव हिवाळे यांनी पत्रकार अंबादास बुरकुल यांचे घरी बाबासाहेबांना अभिवादन केले.

तसेच देऊळगाव मही येथील ग्रामीण रुग्णालय, ग्रामपंचायत भवन, महावितरण कार्यालय, पोलीस चौकी, शासकीय बँक, खाजगी बँक ,बुद्ध विहार तसेच देऊळगाव मही येथे ठीक ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा जोपासणाऱ्या गावकऱ्यांनी साध्या पद्धतीने बाबासाहेबांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करून जयंती साजरी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here