रामटेक न प मध्ये समाविष्ट होणार नाही या निर्धाराने ग्रा प सोनेघाट; वासीयांनाचा रामटेक न प कार्यल्यावर धडकला मोर्चा…

न प मध्ये समावेश न करण्यासंबंधी मोर्चा…

रामटेक – राजु कापसे

रामटेक ग्रा प सोनेघाट चा काही भाग हा रामटेक न प च्या हद्दीत येत असल्याने या भागाचा रामटेक न प सिमेत समावेश न करण्याच्या मागणीस ग्रा प सोनेघाटः वासीयांचा मोर्चा आज 12 जानेवारीला दुपारी रामटेक न प च्या कार्यल्यावर धडकला.मोर्चाचे नेत्रत्व सरपंच सौ अपर्णा वासनिक, काँग्रेस पार्टीचे जिल्हा महासचिव सचिन किरपान,उपसरपंच निलखण्ड महाजन,माजी उपरपंच देवा मेहरकुळे,

काँग्रेस अल्पसंखक जिल्हा अध्यक्ष अस्लम शेख,अश्विन ठाकूर,बबलू धुधबर्वे,नितीन भैसारे,आरिफ मालाधारी यांनी केले.मोर्चा शांतीनाथ जैन मन्दिर परिसरातून निघून प्रचंड नारेबाजी करीत कहारपुरा,झेंडा चौक , गांधी चौक येथून  शेकडो च्या संख्येत महिला पुरुष मोर्च्यात सहभागी होऊन रामटेक न प कार्यालयावर धडकला.येथे मोरच्याचे समापन सभेत झाले.

या ठिकाणी मोर्चेकरिणी न प विरोधात प्रचंड नारेबाजीकरीत कोणत्याही परिस्थितत रामटेक न प आम्ही सामील होणार नाही असा एल्गार सोडला.नंतर न प अध्यक्ष, प्रशासकीय अधिकाऱ्यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.रामटेक न प च्या उत्तरेकडील सीमेवर असलेल्या पिपरिया पेठ,शांतीनाथ जैन मन्दिर,कलंका मंदिराचा मागचा भाग,कवडक,इंदिरा नगर हे क्षेत्र रामटेक न प च्या डीपीआर मध्ये येतात,

परुंतु येथील घरगुती व व्यसायिक मालमतेचा कर हा लागून असलेल्या ग्रा प सोनेघाटः कडून वसूल करण्यात येते.हि बाब काँग्रेसचे नगरसेवक यांनी उघडकीस आणली.व  या मालमत्तेची कर आकारणी वसुली न प मार्फत करावी असा ठराव सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला.तशी रीतसर नोटीस ग्राप सोनेघाटला देण्यात आली. यामुळे ग्रामवासीयांत एकच खळबळ उडाली व त्यांनी या निर्णयाच्या विरोधात एकजूट होऊन आज 12 जानेवारीला मोर्चा काढून न प सामील होणार नाही असा निर्धार केला.

बहुतांश ग्रामस्थांचा कल न.प. प्रशाषणाच्या छत्रछायेकडे
ग्रामपंचायतपेक्षा नगरपरीषदेला विकासात्मक दृष्टीकोणातुन शाशनाकडुन मिळणारा निधी हा साहाजीकच मोठा असतो त्यामुळे विकासकार्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात होतील अशी आनंददादी आशा ग्रामस्थांमध्ये पल्लवित झाल्याने बहुतांश ग्रामस्थांन नगरपरीषदेच्या ठाम भुमीकेचे, निर्णयाचे तथा न.प. सभेतील कर आकारणीच्या ठरावाचे स्वागत केलेले आहे.

यामुळेच की काय तर याच महिण्यात दि. ६ जानेवारीला शेकडो ग्रामस्थांनी न.प. मुख्याधिकाऱ्यांना एक निवेदन देवुन “आम्हाला न.प. प्रशाषणाच्या छत्रछायेखाली राहायचे असुन आमच्या मालमत्तेवर कर आकारणी करावी व सार्वजनीक सोयी सुवीधा पुरवाव्या ” अशी मागणी केलेली होती.नगरपरिषद मध्ये समाविष्ट करण्यासाठी काँग्रेसचे नगरसेवक यांनी पाठपुरवठा केला व सर्वसाधारण सभेत एकमताने ठराव पण घेण्यात आला नंतरच,

या कामाची सुरुवात पण करण्यात आली पण काँग्रेसचेच काही नेते मंडळी यांनी हा सर्व काही नाही से व्हाव्हे असे वाटले म्हणून बहुतांश काँग्रेस चे नेते पदाधिकारी यांनी ग्रामपंचायत यांनी सदर पाठींबा दिला व मोरच्याचे नेतृत्व पण केले व काहींनी तर आपल्या भाषण दरम्यान काही लोकांचे हे षडयंत्र आहे असे म्हटले यावरून काँग्रेस विरुद्ध काँग्रेस आमने सामने असे यादरम्यान दिसत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here