२० हजार वृद्धांचे श्रावणबाळ योजनेचे अनुदान थकित अनुदानाअभावी अडले वेतन दोन महिन्याचे अनुदान प्राप्त…

लाखांदूर :- शासनाच्या श्रावण बाळ वृद्धापकाळ पेन्शन योजनेअंतर्गत मागील चार महिन्यापासून पुरेशा अनुदानाअभावी तालुक्यातील 20 हजार वृद्धांचे वेतन थकित असल्याची खळबळजनक माहिती प्राप्त झाली असून दोन महिन्याचे अनुदान तालुका प्रशासनाकडे उपलब्ध झाली असल्याची माहिती आहे.

प्राप्त माहितीनुसार लाखांदूर तालुक्यात श्रावण बाळ वृद्धापकाळ पेन्शन योजनेचे जवळपास 20 हजार पात्र लाभार्थी आहेत. सदर लाभार्थ्यांना दरमहा सहाशे रुपये अनुदान शासनाकडून दिले जात आहे. मात्र सबंधीत लाभार्थ्यांना मागील चार महिन्यापासून या योजनेअंतर्गत दरमहा वेतन प्राप्त झाले नसल्याची ओरड आहे. शरीर थकल्याने शासन अनुदानावर वृद्धापकाळात कसेबसे जिवन यापीत करताना दरमहा अनुदान मिळत नसल्याने अनेकांवर उपासमारीचे संकट कोसळल्याचे बोलले जात आहे.

कोरोनाच्या भयावह परिस्थितीत शासनाने धान्य पुरवठा करताना दरमहा मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ न दिल्याने या वृद्ध जीवांवर मोठे संकट कोसळले असल्याची माहिती अनेकांनी दिली.

या संबंधाने तालुका प्रशासनाकडून अधिक माहिती घेतली असता श्रावणबाळ वृद्धापकाळ पेन्शन योजनेचे जवळपास दोन महिन्याचे अनुदान उपलब्ध झाले असून तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा देखील करण्यात आले आहेत तर उर्वरित अनुदान प्राप्त होताच तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

दरम्यान वार्धक्याने शरीर थकल्याने उदरनिर्वाहासाठी अन्य उपाययोजना न करू शकणाऱ्या या वृद्धांवर अनुदानाअभावी तुर्तास तरी उपजीविकेचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. याप्रकरणी शासनाने तात्काळ दखल घेऊन तालुक्यातील २० हजारवृद्ध लाभार्थ्यांना दरमहा अनुदान उपलब्ध होन्याहेतू तालुका प्रशासनाला मागील तीन महिन्याचा वृद्धापकाळ योजनेचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी तालुक्यातील जनतेने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here