मूर्तिजापूरात शनिवारी भव्य रक्तदान महायज्ञ…

मूर्तिजापूर – लोकमत रक्ताचं नातं या मोहिमेंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात चालू असलेल्या रक्तदान महायज्ञचा भाग म्हणून मूर्तिजापूर येथे १० जुलै रोजी सकाळी ११ वाजता येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबीर आयोजित केले आहे.

लोकमत रक्ताचं नातं या मोहिमेंतर्गत येथील वंदेमातरम आपत्कालीन पथकाच्या सहकार्याने लोकमतच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी अभयसींह मोहिते, तहसीलदार प्रदीप पवार, नगर परिषद मुख्याधिकारी विजय लोहकरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष राऊत, शहर ठाणेदार सचिन यादव, ग्रामिणचे ठाणेदार रहीम शेख, पोउपनि आशिष शिंदे,

दिपक इंगळे आदी उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमासाठी नेहरू युवा बहुद्देशीय मंडळ कोकणवाडी यासह इतर सामाजिक संघटनांचे मोलाचे सहकार्य मिळणार आहे, या रक्तदान महायज्ञात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन लोकमत व वंदेमातरम आपत्कालीन पथक यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here