नेहरू युवा केंद्राच्या वतीने थीलोरी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न…

दर्यापूर – किरण होले

कोरोना महामारी चे संकट दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सर्व सण-उत्सव, महापुरुषांच्या जयंती ही साध्या कमी लोकांच्या उपस्थितीत पार पाडावे जेणेकरून आपण कोरोना महामारी संकटावर मात करू शकेल. व राज्यभरात रक्तसाठा कमी असल्यामुळे तरुण युवकांनी रक्तदान करण्यासाठी समोर यावे.

त्याच अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाच्या निमित्त 19 फेब्रुवारी रोजी थीलोरी येथे नेहरू युवा केंद्राच्या दर्यापूर तालुका समन्वयीका काजल बानोडे याच्या मार्गदर्शनाखाली वीर भगतसिंग युवा मंडळ च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

रक्तदान शिबिर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे घेण्यात आले. मान्यवराच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या रक्तदान शिबिराला अध्यक्ष म्हणून लाभलेले डॉक्टर दिनेश महाला, प्रमुख पाहुणे म्हणून प्रदीप चौधरी, महेश कुरडकर, विपीन गावंडे, आदींची प्रामुख्याने उपस्थिती लाभली.

या रक्तदान शिबिराला मंडळाच्या 25 तरुनानी रक्तदान करू जनतेपुढे एक आदर्श ठेवला. हा कार्यक्रम भगतसिंग युवा मंडळाच्या अध्यक्ष विक्की उर्फ किरण होले यांच्या नेतृत्वात घेण्यात आला होता. मंडळाचे सदस्य राजेश पावडे, आकाश वाकपांकर, अमोल वानखडे, अजय होले, अक्षय वाकपांजर, आकाश नारे, शुभम सरोदे, राम राऊत, अनिकेत सुरपटने, कुणाल ओलोकार, शुभम धर्माले, शाम राऊत, ऋतिक बोबडे, आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here