मूर्तिजापूर | संदीप संगेले यांच्या स्मरणार्थ…वंदे मातरम आपत्कालीन पथकाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर…

मूर्तिजापूर- येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात वंदे मातरम आपत्कालीन पथकाच्या वतीने स्वर्गवाशी संदीप संगेले यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिर संपन्न. कोरोना वैश्विक महामारी दरम्यान महाराष्ट्रासह भारतातच नव्हे तर जगात या काळा दरम्यान रक्त साठ्याचे गरज भागत असतानाच रक्ताचा तुटवडा ही निर्माण झाला.

मूर्तिजापूर येथील वंदे मातरम आपत्कालीन पथकातील सदस्यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या मित्राचे स्वर्गवास झाल्याने त्याच्या स्मरणार्थ व आपल्या वतीने रक्तदान करून हीच खरी श्रद्धांजली समजत दिनांक 19 रोजी येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात 51 रक्तदात्यांनी रक्तदान करून खरी श्रद्धांजली अर्पित केली नव्हे

तर रुग्णालयात वेळोवेळी आरोग्य प्रशासनाला असो किंवा रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना वंदे मातरम आपत्कालीन पथकातील सदस्य नेहमीच तत्परता दाखवीत मदत करतात हे आजच्या कार्यावरून तरी सिद्ध होते. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेंद्र नेमाडे यांच्या हस्ते लक्ष्मीबाई देशमुख यांच्या पुतळ्यास हारार्पण करून रक्तदान शिबिराचे शुभारंभ केले तर

यावेळी संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान चे संचालक सतीश अग्रवाल, नगरसेवक द्वारकाप्रसाद दुबे, ज्वालादीपचे संपादक बबलू यादव यांनी प्रथम रक्तदान करून रक्तदान शिबिर कार्यास सुरुवात केली या कार्यक्रमाकरिता वंदे मातरम आपत्कालीन पथकाचे अध्यक्ष गंपू शर्मा, महाकालचे लखन मिलान दे, पुंडलिक संगेले, अतुल गावंडे, रितेश चिनप्पा, सेनापती, गौतम दिंडोरे, मोहम्मद इमरान, राहुल थोरात, नरेश मुगल, पप्पू हुमणे, मोहम्मद रियान, सागर वांदे आदींनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here