दोन महिन्यांपासून गायब ग्रामसेवकाचा अर्चना राऊत यांनी घेतला समाचार…

पातूर – निशांत गवई

पातुर तालुक्यातील आलेगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक गेल्या दोन महिन्यांपासून गावात फिरकलेच नसल्याची माहिती अर्चना राऊत यांनी आलेगावच्या नागरिकांकडून मिळाल्यानंतर त्यांनी बिडीओला याबाबत विचारणा करून समाचार घेतला.

आलेगाव येथील नागरिकांना कोरोना पासून वाचविण्यासाठी आर्सेनिक अल्बम थर्टी च्या गोळ्या वाटपासाठी जि. प. सदस्या अर्चना राऊत आलेगाव येथे आल्या होत्या. या कार्यक्रमादरम्यान नागरिकांकडून ग्रामसेवक बाबत काही तक्रारी ऐकायला मिळाल्या. गेल्या दोन महिन्यांपासून ग्रामसेवक गावात फिरकलेच नसल्याने नागरिकांची अनेक कामे रखडली. अशा तक्रारी प्राप्त झाल्या.

तसेच ग्रामसेवक हजर नसताना ग्रामपंचायतीचे कामकाज चालते कसे? आर्थिक व्यवहार कसे पार पडतात? विविध खर्चाचे विड्रॉल कसे होतात? याबाबत प्रश्न उपस्थित झाले. ग्रामसेवकाच्या या मनमानी बाबत अर्चना राऊत यांनी बीडीओ ला विचारणा करून या मनमानी कारभाराबाबत चांगल्याच संतापल्या.

ग्रामसेवक लवकरात लवकर ग्रामपंचायतीत हजर व्हायला हवेत, असे निर्देश त्यांनी संबंधित वरिष्ठांना दिले. यावेळी गोळ्या वाटप कार्यक्रम प्रसंगी जि प सदस्या अर्चना राउत सुभाष जैन बबन काळदाते ग्रामपंचायत कर्मचाऱ्यारी नागेश मोहाडे नामदेव मोहाडे अंगणवाडी सेविका उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here