बोदवड तालुक्यातील शेलवड येथील तत्कालीन ग्राम सेवक चौकशीच्या फेऱ्यात, दप्तर उपलब्ध करून देण्यासाठी तीन दिवसांची मुदत अन्यथा गुन्हा दाखल होणार…

बोदवड – गोपीचंद सुरवाडे

बोदवड तालुक्यातील शेलवड ग्राम पंचायत तीचे तत्कालीन ग्राम सेवक संदीप चंद्रभान निकम याच्या। कालावधीत झालेल्या विविध गैरप्रकारची चौकशी करण्यासाठी दि 7 सप्टेंबर रोजी आले असता ग्राम पंचायत मध्ये विविध प्रकारचे ग्राम पंचायत तीचे लेखे, दप्तर नमुना न 8, नमुना न 10,सह अनेक लेखे चौकशीसाठी उपलब्ध नसल्यामुळे रिकाम्या हाताने परत जावे लागले,

दप्तर उपलब्ध करून देण्यासाठी ग्राम सेवक निकम यास तीन दिवस मुदत देण्यात आली असून उपलब्ध। करून न दिल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल असे उप मुख्यकार्यकारी अधिकारी ग्रा पं श्री बोटे यांनी सांगितले,याबाबत सविस्तर माहिती अशी की शेलवड ग्राम पंचायत तीचे तत्कालीन ग्राम सेवक संदीप चंद्रभान निकम,यांच्या कालावधीतील दलित वस्ती सुधार योजना,

ग्रामनिधी 14 वा वित्त आयोग, नमुना न 8 ,विविध कामातील आक्षेपार्ह गैर प्रकारची चौकशीसाठी त्रिस्तरीय समिती सुद्धा चौकशी करणार असल्याचे सांगितले, ग्राम सेवक निकम याने जामनेर चे शामराव भिकारी नरवाडे यांना नमुना नं 8 नियम 32 (1)सन 2015 ते 2016 ते2019/2020 या वर्षासाठी कर आकारणी नोंदवही ग्राम पंचायत शेलवड चा सिल असलेला व ग्राम सेवक शिक्का असलेला नमुना नं 8 मधील असेसमेंट लिस्ट नुसार दिलेला दाखला तलाठी यांनी पंचनामा केला.

तेव्हा श्री नरवाडे यांनी सादर केला, नमुना नं 8मध्ये अनुक्रमांक 1781आहे,मालमत्ता क्रमांक 1006 असे नमूद करण्यात आले आहे, मालकाचे नाव शामराव भिकारी नरवाडे,आधारकार्ड नंबर2389 4653 6946 हा आहे,भोगवटा दाराचे नाव स्वतः नमूद करण्यात आले आहे, मालमत्तेचे वर्णन बखळ नमूद करण्यात आले आहे, क्षेत्रफळ चौ ,फु,/चौ मी,100 बाय50,5000,स्वके फु नोंद नमूद आहे,

भांडवली मूल्य1954364,नमूद केले आहे, कराचा दर बांधकाम बखळ म्हटले आहे,घरपट्टी 4545 नमूद केले आहे, घरपट्टी, आरोग्य, दिवाबत्ती ,स्पे,पाणीपट्टी, ज पाणी पट्टी,असे एकूण 4545 नमूद केले आहे, अर्जदारास,उतारा ता 16/08/2020 च्या तोंडी मागणी अर्जा प्रमाणे 21/08/2020रोजीदिल्याचे दिसून येते, उताऱ्यावर ग्राम सेवकाची सही व शिक्का ग्राम पंचायतशेलवड आहे,

सदर ग्राम सेवकाने 30 सप्टेंबर 2020 च्या तहसीलदार यांना दिलेल्या खुलाष्यात म्हटले की ग्राम पंचायत दप्तरी नमुना न 8 ला(असेसमेंट)रजिस्टर कोणतीही नोंद नाही,किंवा मी कोणताही उतारा दिलेला नाही,असे म्हटले आहे,मग नमुना न 8 चा उतारा त्यागावतील किराणा दुकान मध्ये किंवा भाजीपाल्याचे दुकानात शामराव भिकारी नरवाडे रा जामनेर यांनी विकत घेतला का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे,

गावातील जनतेच्या चर्चेतून असेही महितीपडते की अनेक लोकांना असे उतारे,दिले आहे, या गैर प्रकारात लाखो रुपये ची डील झाल्याची सुद्धा चर्चा आहे,गावातील नागरिका ऐवजी बाहेर गावच्या नागरिकाला ग्राम सेवक पदाधिकारी या4 /5 लाख रुपये घेऊन जागा देत असतील तर भारत खरोखर विश्व गुरू बनायला वेळ लागणार नाही?

आय एस ओ प्राप्त जिल्हा परिषद जळगांव चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बी ए बोटे काय चौकशी करतात किंवा त्रिस्तरीय समिती काय अहवाल सादर करणार जनता वाट पाहत आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here