Friday, February 23, 2024
Homeराज्यग्रामपंचायत कार्यालय नगरधन तर्फे भव्य महिला मेळावा व हळदी कुंकु कार्यक्रम संपन्न...

ग्रामपंचायत कार्यालय नगरधन तर्फे भव्य महिला मेळावा व हळदी कुंकु कार्यक्रम संपन्न…

Share

रामटेक – राजु कापसे

साजरे करू मकर संक्रमण, करू संकटावर मात, हास्याचे हलवे फुटून, तिळगुळाची करू खैरात…. तिळगुळ घ्या आणी गोळगोळ बोला…! ग्राम पंचायत कार्यालय नगरधन तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नगरधन येथील पटांगणवरती महिला मेळावा निमित्त हळदी कुंकूचे कार्यक्रम आयोजीत करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सौ. वर्षाताई धोपटे, मा. सभापती व मा. सदस्य जि. पं नागपुर, कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री. ॲड.आशिषजी जयस्वाल आमदार रामटेक विधानसभा क्षेत्र, मा.श्री. कृपालजी तूमाने खासदार, रामटेक लोकसभा क्षेत्र यांच्या अर्धांगिनी सौ. रेवतीताई तुमाने, माजी सरपंच सौ. शालिनीताई बागडे, सौ.पौर्णिमा कामडी मुख्याध्यापक, सरस्वती कॉन्व्हेन्ट नगरधन व् इतर मान्यवर हया उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाची प्रास्ताविक सौ, माया अरूण दमाहे सरपंच ग्राम पंचायत नगरधन यांनी केली. या कार्यक्रमामध्ये ग्रा. प कडून काही सास्कृतिक कार्यक्रम आयोजीत करण्यात आले. व लगेच आलेले मान्यवराचे महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. व लगेच वान वाटपाचे कार्यक्रम सुरुवात केली.

या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सन्मानीय सदस्या, उमेदचा सीआरपी सौ. सीमाताई बिरणवार, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, सर्व महिला बचत गटाच्या अध्यक्षा, महिला व गावकरी महिला मंडळी उपस्थित होते


Share
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: